Pune पुणे : अल्पवयीन पिडीतेला फोनवर बोलण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या दोन आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या कोर्टाने दिले आहेत. निगडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी आरोपीवर पोस्को अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
नवनाथ पांचाळ व नागेश पाटील असे निर्दोष मुक्तता केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांच्या तर्फे अॅड. नितीन भालेराव यांच्यामार्फत न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार…!
२०१८ साली एका पिडीतेने दिलेल्या तक्रारी वरून आरोपींच्या विरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यानंतर सरकार पक्ष व आरोपी पक्षाचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. आरोपी तर्फे अँड. नितीन भालेराव यांनी काम पाहिले. केसमधील साक्षीदारांच्या साक्षीमधील तफावत व आरोपींनी फोन केला होता.
दरम्यान, ही बाब सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाने कोर्टासमोर कुठलाही पुरावा सिद्ध न करता उलट काही बाबी दडवून ठेवलेल्या असल्याने आरोपींचा या गुन्ह्याशी कसलाही संबंध नसून सदर आरोपींना खोट्या केस मध्ये गोवल्याचे आरोपी पक्षातर्फे सांगण्यात आले. दोन्ही बाजूंचा पुरावा पाहून दोन्ही आरोपी यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune News : युवकांमधील प्रतिभेला चालना देण्यासाठी युवक काँग्रेसतर्फे यंग इंडिया के बोल स्पर्धा..!