(Pune Accident) पुणे : आपल्या लाडक्या लेकीला पोलीस व्हायचं स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या बापाला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगर परिसरातून हॉटेल प्राईडच्या समोर आज सोमवारी (ता.१३) पहाटेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात बापाचा जागीच मृत्यू झाला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल…!
सुरेश सखाराम गवळी (वय-५५, नाशिक) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीची तारीख कळल्यानंतर आपल्या लेकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व तिला भेटण्यासाठी सुरेश गवळी हे लेक ज्योती गवळी हिला घेऊन नाशिकहून पुण्याला काल रविवारी (ता.१२) संध्याकाळच्या सुमारास आले होते. पुण्यात उतरल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर परिसरातील फुटपाथवर मुक्काम केला.
दरम्यान, मुलगी ज्योती गवळी हिचे ग्राउंड पहाटे दोनच्या वाजण्याच्या सुमारास होते. त्यानंतर सुरेश गवळी हे मुलीला ग्राउंडवर सोडायला गेले. त्यांनी मुलीला रात्री ग्राउंडवर सोडविले. त्यानंतर सुरेश गवळी हे चहा पिण्यासाठी जात असताना एका अज्ञात वाहनाने सुरेश गवळी यांना शिवाजीनगर परिसरातून हॉटेल प्राईडच्या जवळ जोरदार धडक दिली. या अपघातात सुरेश गवळी यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही च्या माध्यमातून वाहनचालकाचा शोध घेत आहेत. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अर्जुन नाईकवाडे करीत आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीला सुरुवात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून युवक-युवती पुण्यामध्ये येत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पालक देखील येत आहेत. अनेकदा आपण पाहिले की या पोलीस भरती साठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांचे पालकांचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे पालक रस्त्यावर फुटपाथवर झोपताना देखील पाहायला मिळत आहेत. आणि यामुळेच वेगवेगळ्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. अशीच एक आज पुण्यात दुख:द घटना घटना घडली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Accident : लोणावळा येथील लोहगड किल्ल्याजवळ सहलीला आलेल्या ७२ विद्यार्थ्यांची बस ४० फुट दरीत कोसळली!