Pune Accident | पुणे : चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने पुण्याकडून बंगळुरूच्या दिशेने जाणारी खासगी प्रवासी बस चांदणी चौक परिसरात रस्त्यावरून १५ ते २० फूट खाली कोसळून अपघात झाल्याची घटना शनिवारी (ता. १८) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये आठ ते दहा प्रवासी जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस शर्मा ट्रॅव्हल्सची होती. या बस मध्ये एकून ३५ प्रवासी प्रवास करीत होते. पुण्याकडून बंगळुरूकडे जाणारी खासगी प्रवासी बस चांदणी चौक परिसरातून निघाली होती. बावधन येथे मुख्य रस्त्यावरुन सेवा रस्त्यावर जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून बस १५ ते २० फूट खाली कोसळली.
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात…
चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. ही बस बायपासवरून साधारण १५ फूट खाली कोसळली आणि पलटी झाली असल्याचे प्रवाश्यांचे सांगितले.
बस रस्त्यावरून कोसळल्यानंतर १० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी कोथरुड परिसरातील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या अपघातामुळे चौंदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्याहून हटवल्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Yavat Crime | अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू ; यवत येथे घडला अपघात
Baramati Crime News : अपघातात मयत झालेल्या ७० वर्षीय वडिलांच्या विरोधात मुलाची पोलीस ठाण्यात तक्रार