Pune पुणे : पुणे शहरासह परिसरात कोयता गॅंग अधून मधून डोके वर काढताना दिसून येत आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा वडकी येथून समोर आली आहे. चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी ज्ञानेश महादेव मात्रे या तरुणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून प्रणव संतोष निगडे व त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
पुण्यातील वडकी येथील एका कंपनीसमोरून संध्याकाळी ज्ञानेश हा दुचाकीवरून घरी जात होता. तेव्हा चार जणांच्या कोयताधारी टोळक्याने कोयत्याने वार करत जीवघणा हल्ला केला व त्यास हॉकीस्टीकने सुद्दा मारहाण केली. या हल्याच ज्ञानेश हा गंभीर जखमी झाला आहे. त्याचावर पुर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला आहे. हल्ला केल्यानंतर घटनास्थळीवरून आरोपींनी पळ काढला. पुढील तपास पोलीस करत आहेत.