Pune पुणे : एकदा मोबाईल हरवला की तो पुन्हा मिळणार नाही, अशी आता आपली खात्री झालेली आहे. परंतू आता तसे होणार नाही. कारण हरवलेले मोबाईल आपल्याला परत मिळू शकतात हे पुणे पोलिसांनी दाखवून दिले आहे. चक्क 5 भाषांचा वापर करुन 9 राज्यातून 51 हरवलेले मोबाईल हस्तगत करण्याची कामगिरी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने केली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाची करवाई…!
या कामगिरीमुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने 9 लाख 50 हजार रुपयांचे 51 मोबाईल नागरिकांना परत केले आहेत.
मोबाईल पोलिसांनी वेगवेगळ्या राज्यातून हस्तगत केले आहेत. यामध्ये उत्तर भारत, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल, पंजाब व महाराष्ट्र या राज्यांचा समावेश होता.
पोलिसांनी हे चोरीला गेलेले फोन वापरकर्ते व संबंधीत पोलीस ठाणे अंमलदार आदेश चलवादी यांनी त्यांना येत असलेल्या वेगवेगळ्या भाषांचा वापर करत अत्यंत कौशल्याने शोधून काढले. यात विविध महागड्या कंपन्याचे 9 लाख 50 हजार रुपयांचे 51 फोन होते. यासाठी पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाईलसचा डेटा तयार केला होता. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांनी कौतुक केले.
यावेळी नागरिकांनी हरवलेल्या फोनची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलिसांच्या वेबसाईटला तसेच शासनाच्याया पोर्टलवर नोंद करावी, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.