पुणे : पेटीएम कंपनीचा प्रतिनीधी असल्याचे भासवुन पेटीएमवरती लोन मंजुर करून दुकानदारांची ३५ हजार रुपये घेऊन गेलेल्या फरार आरोपीला चंदननगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अजितकुमार अक्षयकुमार पटनाईक (रा. सध्या तुळसीनगर, भाजी मार्केट जवळ, शिवले यांचे बिल्डींग मध्ये, चंदननगर, पुणे मुळ रा. स्टेशन बाजार, स्क्वेअर कटक, ओरीसा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुकानदाराला पेटीएम कंपनीचा प्रतिनीधी असल्याचे भासवुन पेटीएम साऊंड बॉक्सवर ऑफर असुन, जुना बॉक्स घेऊन कंपनीकडुन नवीन बॉक्स घेऊन देतो. पेटीएमवरती लोन मंजुर करुन देतो असे सांगितले.
दुकानदारांचा मोबाईल घेऊन त्यामध्ये त्यांचे पेटीएम अकाऊंट पोस्टपेड करुन १० मिनीटांमध्ये पेटीएमवरुन ३५ हजार रुपयांचे लोन मंजुर झाले. त्यानंतर रक्कम स्वतःचे अकाऊंटमध्ये वर्ग करुन घेतली म्हणुन याबाबत फिर्यादी यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना आरोपीचे प्राप्त मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा आरोपी हा चंदननगर परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार त्यास सापळा रचुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वरीलप्रमाणे त्याचे नाव असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अशाच प्रकारे अजुनही दुकानदार, व्यावसायीकांना फसविलेले असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, अशा प्रकारे व्यावसायिक, दुकानदार यांची फसवणुक झालेली असल्यास त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्याशी किंवा संबधीत पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी केले आहे. सदरची कामगिरी चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, यांचे दिमतीत पोलीस उप-निरीक्षक रामेश्वर रेवले, पोलीस अंमलदार सुरज जाधव, अजय शेळके, मनोज भंडारी यांनी केलेली आहे.