पुणे : प्रियकर तरुणाचे अधिकार गाजवणे, प्रेयसीला आवडत नसल्याने प्रेयसीने मोबाईल ब्लॉक केला, यासाठी प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्यासोबत आली नाहीस आपले फोटो व्हायरल करेल, तुझ्या अंगावर अॅसिड टाकेल व माझ्या जीवाचे काही बरेवाईट करेल, अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार खडकी परिसरातून उघडकीस आली आहे.
यश रोहित पटेकर (वय – २२, रा. बोपोडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बोपोडीमधील एका २२ वर्षाच्या तरुणीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश पटेकर व संबंधित फिर्यादी हे दोघे एकाच कॉलेजमध्ये बारावीला शिक्षण घेत होते. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. यावेळी यश पटेकर हा फिर्यादी यांना सारखे फोन करुन त्रास देत असल्याचे व तिच्यावर अधिकार दाखवत असल्याने तिला त्याचे वागणे आवडत नव्हते. त्यामुळे तिने त्याला मोबाईल ब्लॉकलिस्टमध्ये टाकला. तेव्हा तो तिला मेसेज करुन तू मला फोन कर नाही, तर मी तुझे घरी येऊन तुझे माझे काढलेले फोटो व्हायरल करीन अशी धमकी देत असल्याने फिर्यादी त्याच्याशी फोनवर बोलत असत.
गुरुवारी (ता. ०५) फोन केला असता तो तिच्या बहिणीने उचलला. मला फिर्यादीशी बोलायचे असे सांगितल्यावर तिने तो फोन कट केला. त्यानंतर काही वेळाने तो फिर्यादी यांच्या घरात घुसला. त्याने फिर्यादी यांना तू माझे सोबत चल असे म्हणू लागला. तेव्हा तिच्या आई व बहिणीने त्याला मज्जाव केला. त्याने पुन्हा माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझेसोबत चल, असे म्हणून जबरदस्ती करु लागला.
दरम्यान, तिने नकार देताच तुझे व माझे फोटो व्हायरल करुन तुझ्या कुटुंबाची बदनामी करेन, असे बोलून आईला बाजूला ढकलून शिवीगाळ केली. तू माझे सोबत चल नाही तर तुझ्या अंगावर अॅसिड टाकीन, अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी त्यास नकार दिताच त्याने तू आली नाहीस तर मी माझे जीवाचे काही बरेवाईट करीत, त्यास तू व तुझे घरचे जबाबदार असाल, अशी धमकी देऊन तो निघून गेला. त्यामुळे घाबरुन या तरुणीने फिर्याद दिली आहे.