विशाल कदम
Pre-Wedding | पुणे- नियोजित वराने नियोजीत वधुला “प्री-वेडिंग” ट्रीपच्या नावाखाली एका रिसॉर्टमध्ये नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक पुण्यात नुकताच उघडकीस आला आहे. विशेष बाब म्हणजे “प्री-वेडिंग” ट्रीपवरुन घऱी परतल्यावर नियोजीत वराने नियोजीत वधुबरोबर लग्नास नकार दिल्याचेही उघडकीस आले आहे.
देवदत्त वसंत भारदे असे गुन्हा दाखल झालेल्या नियोजित वराचे नाव असुन, या प्रकरणी आळंदी देवाची परीसरातील एका तेवीस वर्षीय तरुणीने आळंदी देवाची पोलिसात तक्रार दिली आहे. आळंदी पोलिसांनी देवदत्त भारदेसह त्याच्या डॉक्टर आई-वडिलांवर, बहिणीचा पती आणि अन्य् एका महिलेवर फसवणुकीचा गुन्हा केला आहे.
पुण्यातीलच एका वधू-वरसूचक मंडळाच्या माध्यमातुन देवदत्त भारदेचे व एका 23 वर्षीय तरुणीचे कांही महिण्यापुर्वी लग्न ठरले होते. साखरपुडा झाल्यावर काही दिवसांसाठी देवदत्त नोकरीसाठी पुन्हा दुबईत गेला होता. दुबईहुन परतल्यावर पीडित तरुणी आणि देवदत्त फिरण्यासाठी “प्री-वेडिंग” ट्रीपच्या नावाखाली रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात असलेल्या एका रिसॉर्टवर गेले होते. रिसॉर्टवर थांबले असतांना, देवदत्तने वधूवर बलात्कार केला. दरम्यान ट्रिपवरुन घऱी परतताच देवदत्त आणि त्याच्या कुटुंबीयांनी वाद घालण्यास सुरूवात केली.
वधुबरोबर लग्नास नकार…
दरम्यान, ट्रिपला जाण्यापुर्वीच मुलीच्या आई-वडीलांनी देवदत्त व संबधित तरुणीच्या लग्नासाठी मंगल कार्यालय निश्चित केले होते. निमंत्रण पत्रिका वाटप करण्याबरोबरच, दागिने, कपडे आदींची खरेदी झाल्याने, मुलींच्या आई-वडीलांनी देवदत्त व त्याच्या कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र समजुत काढुनही देवदत्त लग्नास तयार होत नसल्याने, अखेर आळंदी देवाची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबधित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी देवदत्त याच्या विरोधात फसवणुकीचा आणि देवदत्तवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : पुण्यातील IPS अधिकाऱ्याने घरकाम करणाऱ्या महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी