Praveen Gopale Murder | पुणे : मावळ तालुक्यातील शिरगाव गावचे विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळे यांची भर चौकात काही जणांनी हल्ला करत हत्या केल्याची धक्कादायक आज घडली आहे.
यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या हत्येप्रकरणी पिंपरी चिंचवडच्या गुंडाविरोधी पथकाने चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. काही दिवसापूर्वी शिरगाव ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक झाली होती, त्यामुळे ते प्रसिद्धीझोतात आले होते. भर चौकात एका सरपंचाची हत्या झाली असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.
सरपंच प्रवीण गोपाळे यांची हत्या झाल्याने गावामध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी बडा बंदोबस्त ठेवला आहे. गोपाळे यांची हत्या कोणत्या कारणावरून झाली आहे हे अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांकडून तपास सुरू असून अज्ञात मारेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Good News : पुणे ते मुंबई थेट विमानसेवा होणार सुरु ; एअर इंडियाचा निर्णय