पुणे : मार्केट यार्ड परिसरात गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या आरोपी बटाटा व्यापाऱ्याला पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्या कोर्टाने हा आदेश दिला आहे.
सोनू रोशनलाल कुशवाह असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. सोनू कुशवाह याने अॅड. नितीन भालेराव यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
१२ फेब्रुवारीला मार्केट यार्ड परिसरात एक व्यक्ती गावठी बंदूक घेऊन फिरत असल्याबद्दलची माहिती मार्केट यार्ड पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मार्केट यार्ड पोलिसांनी जागेवरच अटक केली होती. पोलिसांनी आरोपीला नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सागर परीटे असल्याचे सांगितले होते. तसेच त्याच्या अंगाची झाडाझडती घेतली असता त्याच्या कंबरेला गावठी कट्टा मिळून आला होता.
पोलिसांनी तपास केला असता आरोपी सागर हा सोनु कुशवाह या बटाट्याचे होलसेल व्यापारी यांच्या दुकानावर कामाला असून सोनू कुशवाह याने आग्रा येथील एका व्यापाऱ्याकडून ४८ टन बटाटे उधार घेतले होते. व सदर व्यापारी सोनू यास सतत पैसे मागून त्रास देत होता.
१२ फेब्रुवारीला आग्रा येथील व्यापारी अफसर अली खान हे पुणे येथे पैसे घेण्यासाठी आले असता आरोपी याने सोनू कुशवाह याचे सांगण्यावरून अफसर आली शिवीगाळ करून कंबरेला लावलेली बंदूक अफसर आली यास दाखवून सोनु दादाचे पैसे मागू नको, नाही तर मी येथे कांड करणार आहे अशी धमकी दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
आरोपी सोनू कुशवाह याने अॅड नितीन भालेराव यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपी याने कुठलाही गुन्हा केला नसून सह-आरोपी सागर यास पोलिसांनी जागेवर बंदूकिसह सोबत पकडले होते व अफसर आली याने कधीच आरोपी विरुद्ध तक्रार दिलेली नासल्याने फक्त मूळ आरोपी चे सांगण्यावरून सोनू कुशवाह यास खोट्या केस मध्ये आरोपी केले आहे असा आरोपी तर्फे युक्तिवाद करण्यात आला.
दरम्यान, आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे कोर्टाने आरोपीस अटी व शर्तींवर जामीन मंजूर करण्याचे आदेश पारित केल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली आहे. सदर कामी अॅड. मयूर चौधरी, अॅड. भाग्यश्री महाळूनकर, अॅड. संग्राम शिंदे यांनी मदत केली.