Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यासह ५ जिल्ह्यात डाळिंबाचा बोगस विमा काढणारी टोळी सक्रिय! शेतकऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर विम्याची रक्कम हडप…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 February 2023, 12:26

पुणे : पुण्यासह ५ जिल्ह्यात डाळिंबाचा बोगस विमा काढणारी टोळी सक्रिय असून या टोळीने शेतकऱ्यांना अंधारात ठेवून परस्पर विम्याची रक्कम हडप केली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पीकविमा काढण्यासाठी ऑनलाइन सातबारा ग्राह्य धरण्यात येतो. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होते. विमा काढताना संबंधित शेतीचे जिओ टॅगिंग असलेले छायाचित्रही जोडणे आवश्यक असते. पण पीकविमा काढणारी टोळी अन्य ठिकाणच्या शेतीचे छायाचित्र जोडते. आणि विम्याची आलेली रक्कम स्वत:च्या खात्यावर वर्ग करून त्या शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक करते.

दरम्यान, एका गावात मूळ शेतकऱ्याला अंधारात ठेवून परस्पर भाडेकरार करून डाळिंब पिकाचा विमा काढला. विमा कंपनीला संशय आल्यावर पडताळणी केली असता त्या गावात डाळिंबाची बागच काय, एक झाडही नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. असे प्रकार पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि जालना जिल्ह्यात घडले आहेत.

 

पिकविण्याची खोटी उघडकीस आलेली प्रकरणे पुढीलप्रमाणे…
१)राख (ता. पुरंदर, जि. पुणे) या गावातील ६४ शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाचा विमा काढला होता. प्रत्यक्षात पडताळणी केली असता गावातील फक्त दोन शेतकऱ्यांकडे डाळिंबाची बाग असल्याचे स्पष्ट झाले.

२)सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाळिंबाचा विमा काढला होता. प्रत्यक्षात डाळिंबाचे एक झाडही दिसले नाही.

३)सातारा जिल्ह्यात प्रत्यक्षात २९९६.९१ हेक्टरवर डाळिंब आहे, पण ४८०६.५१ हेक्टरवरील डाळिंब पिकाचा विमा काढण्यात आला आहे. साताऱ्यात १८०९.६० हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबाचा बोगस विमा काढून रक्कम हडप करण्याचा डाव उघड झाला आहे.

४)सांगलीत ५०८१.६० तर जालन्यात २७२१९.४६ हेक्टरवरील डाळिंब पिकाचा बोगस विमा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकरणांची प्रत्यक्ष पडताळणी आणि चौकशी सुरू झाली आहे.

याबाबत बोलताना राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे म्हणाले कि, अनेक ठिकाणी बोगस भाडेकरारपत्र जोडण्यात येते. त्यामुळे मूळ शेतकऱ्याला आपल्या शेतावर कुणी विमा काढला आहे, याची माहितीही होत नाही.

विमा रक्कम हडप करणारी टोळी परस्पर रक्कम भरते आणि आपल्या बँक खात्याचा नंबर देऊन विम्याची रक्कम परस्पर आपल्या खात्यात वळती करून घेते, असेही प्रकार घडले आहेत.

याबाबत बोलताना सोलापूर जिल्हा अधीक्षक अधिकारी बाळासाहेब शिंदे म्हणाले कि, शेतकऱ्यांनी फळ पिके आणि अन्य खरीप, रब्बी पिकांवरच विमा काढला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीवर परस्परच विमा काढला गेल्याचे प्रकार घडले आहेत. कृषी विभाग याबाबत अधिक माहिती संकलित करीत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07
Next Post

महाशिवरात्रीमुळे केळींचे दर उच्चांकी पातळीवर ; प्रतिडझनाचे दर ४० रुपयांवरून ८० रुपयांवर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.