हडपसर: आर्थिक व्यवहारांमध्ये अडकलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.१९) रंगेहाथ पकडले आहे.
सागर दिलीप पोमण वय-34, पद- पोलीस उपनिरीक्षक वर्ग – २, नेमणूक – हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर) असे पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या तक्रारी अर्जामध्ये मदत करण्यासाठी आणि तक्रारदार यांचे आर्थिक व्यवहारांमध्ये अडकलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली होती.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोरेगाव पार्क येथील मोका हॉटेल सापळा रचला. या सापळ्यात सागर पोमण याने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.