Police Run Away : पुणे : पोलीस कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्याची अनेक प्रकरणे आपण आजवर ऐकली आहेत. समोरच्या व्यक्तीला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची धमकी देत, या सर्व गुंत्यातून पोलीस अगदी सहीसलामत निसटल्याची उदाहरणे देखील आपण ऐकली आहेत. पण बेलवंडी (ता. श्रीगोंदे) येथे एक आगळीच घटना घडली. एका पोलिसाने बिनबोभाट लाच घेतली… अन् घेतलेली लाच कपाटात ठेव, असे सांगितले. फिर्यादी लाचेची रक्कम कपाटात ठेवत होता, इतक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक तेथे पोहोचले. संबंधित पोलिसाला संशय आला आणि त्याने चक्क शेजारील उसाच्या शेतात धूम ठोकली… त्याचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही. ही घटना बेलवंडी (ता. श्रीगोंदे) येथील पोलीस ठाण्यात बुधवारी (ता. २१) सांयकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुरुवारी (ता. २१) पहाटे अडीच वाजता गुन्हा दाखल झाला आहे. (Police Run Away)
लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे असे आहे.
या लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव ज्ञानेश्वर रावसाहेब पठारे असे आहे. त्याच्याविरोधात आलेल्या तक्रारीनुसार नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बेलवंडी पोलीस ठाण्यात सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे फिर्यादी रक्कम घेवून ठाण्यात गेला. तेथे साहेबांचे ऑडिट सुरु असल्याने पोलिसाने फिर्यादीस ‘रक्कम कपाटात ठेव’ असा संदेश दिला. (Police Run Away) त्याचवेळी एसबीचे पथक ठाण्यात पोहचले. पथकातील कर्मचारी फिर्यादीसोबत कपाटाकडे गेले. त्याचवेळी संशय आल्याने कुठलाही विचार न करता पोलीस पठारे याने ठाण्यातूनच धूम ठोकली. रात्री उशिरापर्यंत उसाच्या शेतात शोध सुरु होता; मात्र, पोलीस काही सापडला नाही.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी व त्याच्या पत्नीविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील जामीन प्रक्रियेत मदत करतो म्हणून चार हजार रुपयांची मागणी आरोपी पठारे याने केली होती. बेलवंडी पोलीस ठाण्यात ‘साहेबां’च्या जवळ असणाऱ्या पठारे या हवालादाराने लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे दाखल झाली. लाच देण्याचे बुधवारी ठरले होते. त्यानुसार एसीबीचे पथक बेलंवडीत होते. एसीबी पथकाच्या इशाऱ्यावर फिर्यादी बेलंवडी पोलीस ठाण्यात दाखल झाला. चार हजार रुपये आणल्याचे फिर्यादीने पठारे यांच्याजवळ जात सांगितले. त्यावेळी बेलवंडी पोलीस ठाण्यात नगरचे पथक ऑडिट करीत होते. त्यामुळे पठारे याने फिर्यादीला मागच्या खोलीतील कपाटात रक्कम ठेवण्यात सांगितली अन् कट उघडकीस आला. (Police Run Away)