Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : कमी उंचीमुळे पोलीस भरती हुकली, पण समाजात मिरवण्यासाठी रचला खोटा बनाव ; नऱ्हे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 21 April 2026, 18:46

पुणे, : पोलीस दलात भरती झाल्याचे खोटे सांगून सोसायटीत पेढे वाटणाऱ्या आणि स्वतःच्या अभिनंदनाचे फलक (फ्लेक्स) लावणाऱ्या एका तरुणाचा बनाव नऱ्हे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलीस कर्मचारी जेव्हा या ‘नूतन’ सहकाऱ्याचे अभिनंदन करायला गेले, तेव्हा तो पोलीस नसून एक भाजी विक्रेता असल्याचे समोर आले. याप्रप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

ऋषीकेश राजू जाधव (वय -26, रा. तिडके डेअरीजवळ, नऱ्हे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. ऋषीकेशला पोलीस दलात भरती होण्याची प्रचंड ओढ होती, मात्र उंची कमी असल्याने त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. घरच्यांनी त्याला लग्नाचा विचार करून भाजीपाला विक्रीच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. मात्र, समाजात आपला प्रभाव पाडण्यासाठी त्याने आपण पोलीस झाल्याची खोटी माहिती पसरवली.

 

ऋषीकेशने काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबीयांना आपली पोलीस दलात निवड झाल्याचे सांगितले. एवढ्यावरच न थांबता त्याने स्वतःचे पोलीस गणवेशातील छायाचित्र आणि पोलीस दलाचे बोधचिन्ह वापरून चौकात अभिनंदनाचे मोठे फलक लावले. सोसायटीमध्ये त्याने मोठ्या उत्साहात पेढे वाटून सर्वांचे तोंड गोड केले. इतकेच नव्हे तर, सोशल मीडियावरही त्याने पोलीस वर्दीतील फोटो ठेवून आपण ‘खाकी’त आल्याचा आभास निर्माण केला.

आपल्या हद्दीतील एक तरुण पोलीस दलात भरती झाल्याची माहिती नऱ्हे पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांना मिळाली. आपल्या नवीन सहकाऱ्याचे कौतुक करण्यासाठी आणि त्याचे अभिनंदन करण्यासाठी पोलीस कर्मचारी त्याच्या घरी पोहोचले. मात्र, तिथे गेल्यावर आणि चौकशी केल्यावर पोलिसांना संशय आला. सखोल विचारपूस केली असता, ऋषीकेशने केवळ मिरवण्यासाठी हा सर्व बनाव रचल्याचे कबूल केले.

दरम्यान, पोलीस दलाच्या बोधचिन्हाचा गैरवापर करणे आणि तोतयागिरी करून समाजाची दिशाभूल केल्याप्रकरणी ऋषीकेश जाधव विरुद्ध नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “उंची कमी असल्याने भरती होऊ शकलो नाही, म्हणून हे कृत्य केले,” अशी कबुली त्याने दिली आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

Pune fraud : “एमबीबीएस प्रवेशाचे आमिष; जुळ्या मुलींच्या नावाखाली 5 लाखांची फसवणूक!” एड्युव्हिओ कंपनीविरुद्ध गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.