लोणी काळभोर, (पुणे) : हडपसर, चतुश्रृंगी, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटर सायकल चोरी, दरोडा, जबरी चोरी या गुन्ह्यात फरारी असलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी जेरबंद केले.
राहुलसिंग रविंद्रसिंग भोंड (वय -१८, रा. कॅनॉल शेजारी, तुळजा भवानी वसाहत, हडपसर,) व त्याचा साथीदार कैफ मूनजीर अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, युनिट सहाचे पथक हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत होते. यावेळी पोलीस अंमलदार नितिन मुंडे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरिल गुन्हेगार राहूलसिंग भोंड याने केलेला असून तो गंगानगर कॅनॉल शेजारी असलेले मोकळे मैदानात थांबलेला आहे व त्याच्या ताब्यातील गाडी चोरीची आहे.
मिळालेल्या माहिती वरिष्ठांना सांगून, त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, सदर ठिकाणी सापळा रचून राहुलसिंग भोंड, याला व त्याच्या ताब्यातील मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हडपसर, चतुश्रृंगी, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी, वाहनचोरी केली असल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखिले, ऋषिकेश टिळेकर, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, एम वाळके, विठ्ठल खेडकर, प्रतीक लाहीगुडे, रमेश मेमाणे, सचिन पवार, नितीन घाडगे, असफाक मुलाणी, सुहास तांबेकर, ज्योती काळे यांनी केली आहे.