बारामती, (पुणे) : Baramati Crime News – मोरगाव-निरा रस्त्यावर वाहनचालकाला चाकुचा व कोयत्याचा धाक धाकवुन रोख रक्कम ८ लाख रुपये व मोबाईल फोन चोरी करून घेऊन फरार झालेल्या, Baramati Crime News) तीन आरोपींच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Baramati Crime News)
स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांची संयुक्त कामगिरी..!
मोहित भिकुलाल भंडारी, अमोल विठ्ठल कुमावत, (रा. दोघेही सिल्लोड, जि. संभाजीनगर, इफ्ताकर नईम शेख रा. संभाजीनगर, जि. संभाजीनगर असे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख १ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ३० एप्रिल) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मोरगाव निरा रोडवर कापड खरेदी करण्यासाठी बुलेरो पिकअप मधून निघालेल्या चालकाला अज्ञात इसमांनी पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी आडवी लावून चाकुचा व कोयत्याचा धाक धाकवुन चालकाजवळील रोख रक्कम ८ लाख ७ हजार रुपये व एक मोबाईल फोन चोरी करून घेऊन गेल्याची तक्रार पिकअप चालक मोहम्मद अब्दुल रहिम कुरेशी यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांना वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार एक पथक तयार करण्यात आले. त्यानुसार पोलीस पथक तपास करीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील वरील तिघांनी केला आहे. त्यानुसार वरील तिघांनाही सदर ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्यापैकी इफ्ताकर नईम शेख याच्याकडून रोख १ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. आरोपींना न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सोमवारी (ता. १०) रिमांड कोठडी ठोठावण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस सचिन काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, राजु मोमीन, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, आसिफ शेख, सहा फौज काशीनाथ राजापुरे, वडगाव निबाळकर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार मारकड, दरेकर यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati Robbery : सुप्यातील ‘महालक्ष्मी ज्वेलर्स’दरोडा प्रकरणातील आणखी एक आरोपी जेरबंद !