पुणे : येरवडा भागातील पर्णकुटी पायथा परिसरात महिलेवर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
सतिष संतोष हारवडे (वय ४५, रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील पर्णकुटी पायथा परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी पोलिसांना टोपी आणि चप्पल सापडली होती. पोलिसांनी तपास केला असता, मृत महिलेवर बलात्कार करून खून केल्याचे निष्पन झाले होते. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
सदर खुनाचा तपास करीत असताना, पोलिसांनी येरवडा परिसरातीलील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात घटनास्थळापासून काही अंतरावर टोपी घातलेली व्यक्ती कचरा वेचत असल्याचे आढळून आले होते.
त्यानंतर पोलिसांनी भंगार माल खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांकडे चौकशी सुरू केली. तेव्हा पोलिसांना चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हारवडे नदीपात्रातील चिमा घाट परिसरात एका बाकावर झोपल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी सतिष हारवडे याला ताब्यात घेऊ न अधिक चौकशी केली असता, आरोपीने सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. हि कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, उपनिरीक्षक अंकुश डोंबळे, पोलीस कर्मचारी अनिल शिंदे, कैलास डुकरे, गणपत थिकोळे आणि सूरज ओंबासे यांच्या पथकाने केली आहे.