पिंपरी : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नाकाबंदीच्या वेळी शिरगाव पोलिसांना पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर तब्बल ५० लाखांची रोकड सापडली आहे. याबाबत शिरगाव पोलीस अधिक तपास करत असून नेमकी ही रक्कम कुठे आणि कशासाठी घेऊन जात होते. याबाबतची चौकशी पोलीस करत आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली आहे.
संपूर्ण देशासह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका लागल्या आहेत. आचारसंहिता लागली आहे. या पार्शवभूमीवर मावळ लोकसभेसह इतर मतदारसंघात देखील नाकाबंदी करण्यात येत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर नाका बंदी करण्यात आली होती यावेळी शिरगाव पोलिसांना चारचाकी वाहनात तब्बल ५० लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मुंबईहून पुण्याच्या दिशेने हे चार चाकी वाहन जात असताना पोलिसांनी त्या चारचाकीला अडवली. चारचाकीची तपासणी केली असता यामध्ये ५० लाख रुपयाची रोखड पोलिसांना आढळली. एवढी मोठी रक्कम कुठे आणि कशासाठी घेऊन जात होते. याबाबतची चौकशी शिरगाव पोलीस करत आहेत. सध्या लोकसभा निवडणुका लागल्याने मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने पिंपरी- चिंचवड पोलीस तपास करत आहेत.