गणेश नारंग
Pimpri News : पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड व पुणे शहरांमध्ये घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगा वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चोरट्याकडून 12 लाख 20 हजार रुपयांचे वीस तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. (Wakad police handcuffed Gharfodya)
सचिन भीमराव पाटील या आरोपीला पोलिसांनी अटक केली.
वीस तोळे सोने केले जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सचिन भिमराव पाटील हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर वाकड चतुर्शिंगी आणि चंदन नगर पोलीस ठाण्यात घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेत. (Pimpri News) आरोपी सचिन भीमराव पाटील हा पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरांमधील विविध ठिकाणी बंद घरांच्या कडी व कोंयडा तोडून घरफोड्या करत होता.
सचिन भिमराव पाटील हा पिंपरी चिंचवड मधील जगताप डेरी ब्रिज खाली थांबला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. वाकड पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्या जवळील वीस तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. आरोपी जवळ घरफोड्या करण्यासाठी लागणारा छोटा रॉड आढळला आहे. (Pimpri News) वाकड पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने अगोदर उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या असता, त्याने चोरी केलेले वीस तोळे सोन्याचे दागिने कुठे ठेवले याची माहिती दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावळ वाढ यांच्या टीमने केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरी चिंचवड पोलीस दलातील कर्मचा-याची आत्महत्या
Pimpri News : 12वीच्या परिक्षेत अपयश आल्याने विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या
Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये गौतमीचा कार्यक्रम घेणं बर्थडे बॉयच्या अंगलट; गुन्हा दाखल