Pimpri News : पिंपरी-चिंचवड : घरातून पळून जात प्रेमविवाह केलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या कुटुंबियांना आमची मुलगी कुठे आहे म्हणत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तसेच माझी मुलगी मिळाली नाही तर तुला व तुझ्या पतीला बघून घेतो अशी धमकी दिली आहे. हा प्रकार पिंपरी-चिंचवड परिसरातील थेरगाव येथे बुधवारी (दि. 28) रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान घडला आहे.
थेरगाव येथील घटना
याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pimpri News) त्यावरून संभाजी शेलार (वय 51), रामचंद्र शेलार (वय 47), तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मुलाचे व आरोपींच्या मुलीचे प्रेमप्रकरण होते. त्यातून त्यांनी पळून जात लग्न केले. दरम्यान या कारणावरून आरोपी तक्रारदार यांच्या घरी आले. (Pimpri News) आमची मुलगी कोठे आहे, अशी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावर आपल्याला काहीही माहिती नसल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. त्यावरून आरोपींनी त्यांना, त्यांचे पती आणि सासूला मारहाण केली. माझी मुलगी मिळाली नाही तर तुला व तुझ्या पतीला बघून घेतो, अशी आरोपींनी तक्रारदार यांना धमकी दिली असल्याचे तक्राररीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पत्नी, मेहुणीला मारहाण करणार्यावर पतीसह त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा
Pimpri News : पिंपरीत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट लावला उधळून