Pimpri News : (पुणे) रहाटणी येथे दबा धरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी (ता. १५) रात्री दोनच्या सुमारास ही कारवाई केली आहे. या घटनेत तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.(Pimpri News)
रहाटणी येथे दबा धरून दरोडा.
वेंकटेश सुरेश नाईक (वय २४), चेतन काकासाहेब वाघमारे (वय २३), शेखर काळूराम जांबूरे (वय १९, तिघे रा. काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.(Pimpri News) त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचा एक साथीदार पळून गेला. पोलिस अंमलदार विनायक घारगे यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.(Pimpri News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथून जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काहीजण संशयितपणे थांबले असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चौघांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. ताब्यात घेतलेल्या चौघांकडून एक तलवार, दोन कोयते, मिरची पूड, दोन मोबाईल फोन, एक दुचाकी असा एकूण २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.(Pimpri News)
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चौघांकडे पोलिसांनी केली असता आयटी पार्कमधील कर्मचारी रात्री काम संपल्यानंतर घरी जातात. या मार्गाने रात्री घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटण्याचा कट रचला होता, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.