Pimpri News : पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे विवाहित महिलेने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मानसिक तणावातून ही आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मोशी येथील घटना
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील सह्याद्री सोसायटीमध्ये संबंधित महिला पती आणि लहान मुलासह गेल्या तीन महिन्यापासून राहत होती. (Pimpri News) महिलेचा पती संगणक अभियंता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, आज सकाळी पती आणि मुलगा घरी असताना ही महिला थेट इमारतीच्या नवव्या मजल्यावर गेली. तेथून थेट खाली उडी घेत महिलेने आत्महत्या केली. आत्महत्येची घटना आज (ता. ४ जून) सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली. (Pimpri News) ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : मावळ तालुक्यातील खोली भाडेतत्त्वार देण्यास नकार दिल्याने कोयत्याने तोडफोड
Pimpri News : सणाकरीता दिलेले पैसे परत मागितल्याने शिवीगाळ व धक्काबुक्की करून महिलेवर बलात्कार