Pimpri News पिंपरी-चिंचवड : मैत्रिणीच्या मदतीने पार्टनरचा काटा काढण्यासाठी ५० लाखाची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत उघडकीस आला आहे. (Pimpri News) याप्रकरणी दरोडा विरोधी पोलीस पथकाने सीएसह तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. (Pimpri News)
३ देशी पिस्टल व २४ जिवंत काडतुसे जप्त
याप्रकरणी पोलिसांनी सीए विवेक नंदकिशोर लाहोटी, रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार सुधीर अनिल परदेशी व एका महिलेस अटक केली आहे. या दोन्ही आरोपींच्या ताब्यातून ३ देशी पिस्टल आणि २४ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीए विवेक नंदकिशोर लाहोटी व राजू माळी हे दोघेही जमीन खरेदी -विक्रीचा व्यवसाय करीत असून ते दोघे व्यावसायिक भागीदार आहे. या व्यवसायातून उद्भवलेल्या वादातून सीए विवेक लाहोटी यांने राजू माळी यांचा सुपारी देऊन खून करण्याचा कट रचला.
यासाठी लाहोटी यांनी माळी यांचा खून करण्यासाठी आपल्या जवळच्या एका मैत्रिणीच्या मदतीने रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार सुधीर अनिल परदेशी आणि शरद साळवी याला ५० लाख रुपयाची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी वरील तिघांनाही अटक केली आहे. तर यातील दोन्ही आरोपींच्या ताब्यातून ३ देशी पिस्टल आणि २४ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलीस करीत आहेत.