Pimpri News ; पिंपरी-चिंचवड : टेलिग्रामवर बनावट खाते बनवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी येथून समोर आला आहे. खोटी ओळख सांगत व्यक्तीची तब्बल साडेसहा लाखांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 9 ते 24 जानेवारी या कालावधीत संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडला.
पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
वासिम नुरमोहम्मद तांबोळी (वय 35, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pimpri News) त्यानुसार 919419358856 क्रमांक धारक अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादीला व्हाट्सअपवरून संपर्क केला. ती महिला ग्लोबल चॅट प्लॅटफॉर्म सिंगापूर या कंपनीची एच आर मॅनेजर असल्याचे तिने सांगितले.(Pimpri News) त्यानंतर बनावट टेलिग्राम खाते बनवून त्यावरून खोटी ओळख दर्शवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यातून फिर्यादीची सहा लाख 65 हजार 650 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरी-चिंचवड : भरधाव कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा मृत्यू..
Pimpri News : फसवणुकीचा नवा फंडा; ‘टास्क फ्रॉड’मधून महिलेला घातला तब्बल 88 लाखांचा गंडा