Pimpri News : पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात गांजाचा साठा करणाऱ्या व्यक्तीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून तब्बल आठ लाख रुपये किमतीचा ३२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.६) मुंजाबा चौक, भोसरी येथे करण्यात आली. (32 kg ganja worth eight lakh seized in Bhosari)
भोसरी गावठाण येथे पोलिसांची कारवाई
याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस नाईक विजय दीपक दौंडकर यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. (Pimpri News) त्यानुसार पोलिसांनी संजय मोहन शिंदे (वय ३६, नेहरुनगर, भोसरी) याला अटक केली आहे तर, सूरज झंजाळ (रा. चाकण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी गावठाण या ठिकाणी आरोपी संजय मोहन शिंदे हा गेल्या काही महिन्यापासून राहत असून त्याने आठ लाख रुपये किमतीचा ३२ किलो गांजाचा साठा जमा केला होता अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. (Pimpri News) पथकाने त्या ठिकाणी छापा मारून त्याच्याकडून ३२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. संबंधित गांजा हा सुरज जंजाळ राहणार चाकण यांच्याकडून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून त्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.