पिंपरी Pimpri Crime : पैसा आजकाल सर्वांना हवाच आहे, मात्र त्यासाठी कष्ट करण्याची तयारी न ठेवता, सहज पैसे कसे येतील याता अधिक विचार केला जातो. (Pimpri Crime) झटपट पैसे मिळवण्याच्या नादात अनेकांना चांगलाच फटका बसल्याची उदाहणे आहेत. असेच एक प्रकरण समोर आले आहे. (Pimpri Crime) घर बसल्या काम मिळेल फक्त पाठवलेल्या लिंकवरील व्हिडीओला लाईक करायचे, तसेच ठराविक रक्कम गुंतवली तर दुप्पट रक्कम त्याच दिवशी परत मिळणार, असे अमिष दाखवून तरुणाचे आठ लाख ९६ हजार ४०० रुपये वेळोवेळी घेऊन फसवणूक केली. (Pimpri Crime)
वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी विभोर विनय शुक्ला (वय ३३ रा. थेरगाव) यांनी रविवारी (दि.२३) वाकड पोलीस ठाण्यात फ्री लान्सर कंपनीत काम करणारी महिला लतीशा, फराह, मेसेज करणारी अलीना नावाची महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.१२) ते गुरुवार (दि.२०) या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अनओळखी नंबरवरून व्हॉट्सपवर मेसेज आला. व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील तसेच ठराविक रक्कम पाठविल्यास त्याच दिवशी जास्तीचे पैसे मिळतील, असे अमिष या मेसेजमधून दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. लिंक पाठवून फिर्यादीला टास्क पूर्ण करण्यास सांगून त्याप्रमाण पैसे गुंतविण्यास भाग पाडले. तसेच टेलिग्रामवर एक ग्रुप जॉईन करण्यास सांगून तब्बल आठ लाख ९६ हजार ४०० रुपये पाठविण्यास सांगितले. फिर्यादी यांना पैसे पाठवले मात्र, हे पैसे परत न आरोपींनी पैशाचा अपहार करत आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; चार महिलांची सुटका, वाकडमधील प्रकार…
Pimpri Crime : सराईत चोरट्यांकडून २२ लाखांच्या ४३ दुचाकी जप्त ; वाकड पोलिसांची कामगिरी..!