Pimpri Crime | पिंपरी : ओळखीचा फायदा घेत बनावट चावीच्या साह्याने घर उघडून दीड लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
उमेश रमेश भोसले (वय २८, रा. आवसा, लातूर) याला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल दीड लाखाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. १७) अमोल दिलीप सावंत यांच्या घरी चोरी झाली. चोरट्याने सोन्याचे गंठण, मिनी गंठण, ठुशी अंगठी असा ऐवज चोरून नेला. घराला कुलूप असताना ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केल जाते होते. याप्रकरणी पोलिसांमध्ये फिर्याद देखील दिली होती. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता त्यांनी सापळा रचून आरोपी उमेश रमेश भोसले याला ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांना त्याच्याकडे सर्व दीड लाख रुपये किमतीचे दागिने मिळून आले. त्याने ओळखीचा फायदा घेत बनावट चावी बनवून ही चोरी केल्याचे पोलीस तपासात सांगितले. तब्बल दीड लाख रुपये किमतीच्या सोन्यासह चोरट्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल दीड लाखाचे सोन्याचे दागिने जप्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Baramati Crime | बारामतीत दहा ते बारा भटक्या कुत्र्यांचा दीड वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला