पिंपरी-चिंचवड : Pimpri-Chinchwad Crime – पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेदारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दरम्यान अशीच एक घटना चिखली येथून समोर आली आहे. (Pimpri-Chinchwad Crime ) हॉटेल चालकासह अन् दोघांना रात्री उशिरा जेवण न दिल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून जबर मारहाण केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 4) रात्री अकरा वाजताच्या सुमारास माऊली हॉटेल येथे घडला आहे. (Pimpri-Chinchwad Crime )
याप्रकरणी ज्ञानेश्वर इलप्पा हेरवे (वय 26, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दिनेश खरात (वय 22) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार यांचे चिखली येथे म्हेत्रे गार्डन रोडवर हॉटेल आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजता ते हॉटेल बंद करत असताना दिनेश आणि त्याचे दोन साथीदार आले. त्यांनी जेवायला दे, अशी मागणी केली. मात्र हॉटेल बंद झाल्याने फिर्यादी यांनी आरोपींना जेवण दिले नाही. त्यानंतर हॉटेलच्या बाहेर असलेल्या टपरीवर आरोपी गेले. तिथे त्यांनी सिगारेट घेतली.
यावेळी तक्रारदार यांच्या मामांनी आरोपींना सिगारेटचे पैसे मागितले. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या मामांना मारहाण केली. ते भांडण सोडविण्यासाठी तक्रारदार गेले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. हॉटेल मधील कामगार भांडण सोडविण्यासाठी आला असता आरोपींनी कामगाराला देखील मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime | व्हॉट्सअॅपवरील मैत्री पडली 38 लाखांना ; महिलेची केली फसवणूक…!