(Pimpri Chinchwad Crime )पिंपरी-चिंचवड : तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातून समोर आला आहे. ऐवढेच नव्हे तर तरुणाने तिच्याकडून तब्बल तीन लाख रुपये घेत फसवणूक केली आहे. हा प्रकार जुलै २०१९ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत भोसरी, हिंजवडी येथे घडला.
याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने तक्रार दाखल केली असून त्यावरून राकेश रविंद्रनाथ नायर (वय २२रा.भोसरी) याच्या विरोधात आर्थिक फसवणूक व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार…!
तक्रारदार तरुणीला आरोपी तरुणाने सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवले व यातून तरुणीच्या विरोध असतानासुद्धा जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले व पिडित तरुणीकडून वेळोवेळी ३ लाख रुपये अंदाजे घेतले. त्यानंतर त्याने पीडितेला शारीरिक व मानसीक त्रास दिला. शेवटी तरुणीला हे सहन न झाल्यामुळे तिने पोलीसात धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.