Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड : गांजाची विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल सव्वा लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी 16 मे रोजी देहुरोड येथील कृष्णा पॅलेस हॉटेल जवळ करण्यात आली.
प्रकाश नरेंद्र बेहरा (वय 25 रा.शिरोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई मितेश मोहन यादव (वय 32 ) यांनी फिर्याद दिली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, देहुरोड येथील कृष्णा पॅलेस हॉटेल जवळ एक तरुण गांजाची विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली. त्यानंतर पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा रचला. यात आरोपीला गांजासह अटक करण्यात पथकाला यश आले.
त्यांच्याकडून 1 लाख 30 हजार 750 रुपयांचा 5 किलो 230 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला. हा गांजा आरोपीने पाश्या अण्णा (रा. झारखंड) याच्याकडून आणल्याचे कुबूल केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pimpri News | चिडलेल्या आईने बांबूने बेदम मारहाण केल्याने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू