Pimpari Fraud | पिंपरी : कंपनीचा डाटा आणि गोपनीय माहिती स्पर्धक कंपन्यांना दिली. तसेच कंपनीच्या साहित्यात बिघाड करून तब्बल दीड कोटीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुकेश गोपाळ शर्मा (वय ५०, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रविंद्र शंकर जाधव (रा. पिंपळे गुरव), अभिषेक संजय जोशी (रा.औरंगाबाद), जयंत सुरेंद्र त्रेहान (रा.चंदीगढ), इंद्रजित लाल सिंग (रा. चंदीगढ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सन २०१७ पासून ९ एप्रिल २०२३ . या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने तसेच सांगवी येथील ऑफीसमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कंपनीत काम करत असताना त्यांनी एकत्र येत कंपनीचे आर्थिक नुकसान करण्यासाठी कट रचना. तसेच कंपनीकडून प्रात्यक्षिक देण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यामध्ये बिघाड करून कंपनीचे दीड कोटीचे नुकसान केले. तसेच आरोपी इंद्रजित लाल याने सांगवी येथील कंपनीच्या ऑफीसमधील साहित्य जाताना चोरून नेले.
आरोपी यांनी कंपनीने कामासाठी दिलेले लॅपटॉप, मोबाईल, सिमकार्ड , ईमेल्स कंपनीचे काम सोडून जाताना जमा न करता त्याचा बेकायदेशीर वापर केला. कंपनीचा डाटा चोरून डाटा व्यावसायिक स्पर्धेक कंपन्यांना देवून करोडो रुपयांचे टेंडरिंगमध्ये आर्थिक नुकसान केले आहे.
कंपनीची वेबसाईट जाणीवपूर्वक बंद…
कंपनीची वेबसाईट जाणीवपूर्वक बंद पाडून कंपनी बंद झाल्याचे कंपनीच्या कस्टमरला चुकीची माहिती देत अपप्रचार केला. तसेच कंपनीच्या मुख्य ऑफीसमधील डाटा चोरून तसेच चुकीचा डाटा तयार करून व्यावसायिक स्पर्धकांना देऊन फिर्यादीच्या कंपनीची फसवणूक करत आर्थिक नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Crime News | पुण्यात भरदुपारी तरुणांना हत्याराच्या धाकाने लुटले; मुंबई -पुणे महामार्गावरील घटना
Pune News : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाच्या रिक्त पदासाठी १८ मे रोजी मतदान
Pune News | आईच्या आठवणी जपण्यासाठी पोरांनी उभारलं स्मारक ; पुण्यातील गोळे कुटुंबियांचा आदर्श..!