Pimpari Crime News : पिंपरी : चित्रपटालाही लाजवेल असा थरार प्रत्यक्षात (actually happened) घडल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन मित्रांनी मिळून दोन मित्रांचा लुटले. (Three friends together robbed) चालत्या कारमध्ये एकाच्या डोळ्यात मिरची पूड(Chilli powder) टाकली. तसेच त्याच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची चैन ( five tolas from his neck) ओढून घेतले. ही घटना शुक्रवारी (दि.७) मुंबई-बेंगलोर हायवेवर बाणेर (Mumbai-Bangalore highway Baner) जवळ घडली. Pimpari Crime News
या प्रकरणी सागर बाळासाहेब पाटील (वय ३१, रा. देहुगाव ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंद उर्फे भैय्या (वय ३२), राजकर (वय ३०), ओंकार उर्फे संकेत रवींद्र इंगळे (वय २५), सर्व रा.रा. विजयवाडी, अकलूज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे मित्र आहेत. हे सर्व मित्र मिळून उज्जैन येथे जात होते. मात्र, फिर्यादी यांनी उसने घेतलेले पैश्याच्या कारणावरून आरोपी ओंकार हा फिर्यादी यांची गाडी चालवत होता. तर फिर्यादीचा आणखी एक मित्र किरण हा गाडीत मागील सीटवर बसला होता. आरोपी आनंद आणि राजकर यांनी किरणच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. तसेच आरोपी राजकर याने किरण याच्या गळ्यातील दोन लाख रुपये किंमतीची सोन्याची साखळी ओढून घेतली.
किरण याने चालत्या गाडीतून हायवेवर उडी मारली. तर, फिर्यादी यांनी गाडीचा हॅँडब्रेक ओढला असता आरोपी आनंद याने त्यांच्या हातावर चाकूने वार केला. तसेच त्यांच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकून त्यांना गाडीतून खाली ढकलून दिले. यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले असून किरण यांनी फिर्यादी यांना ससून रुग्णालायात दाखल केले.
दरम्यान, आरोपी गाडीमधील कपड्याची बॅग, मोबाईल तसेच किरण यांचा एक लाख रुपये किंमतीचे एक लाख रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन, तसेच डिक्कीच्या बॅगमध्ये ठेवलेले एक लाख रुपये तसेच २० लाख रुपये किंमतीची कार घेऊन गेले आहेत, असे फिर्यादीत नमूद आहे.