पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातच्या हद्दीत ‘स्पा-मसाज सेंटर’च्या नावाखाली वेश्याव्यावसाय सुरु असलेल्या ‘स्पा’वर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने छापा टाकला असून याप्रकरणी दोघांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातच्या हद्दीतील पिंपळे सौदागर येथे एका उच्चभ्रू वस्तीतील बहुमजली इमारतीत एक स्पा सेंटर सुरू होते. येथे मोठ्या प्रमाणात महिलांसह पुरुषांची रेलचेल होती. पोलीसांनी बनावट ग्राहक बनवून पडताळणी केली असता, येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.
स्पा सेंटरच्या मालकांनी अनेक महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू केला होता, त्यामध्ये महिलांसह पुरुषांचाही सहभाग होता. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती, त्याच पार्श्वभूमीवर पोलीसांनी बनावट ग्राहक पाठवून मोठी कारवाई केली आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू वसाहतीत असलेल्या या स्पा सेंटरच्या कारवाईने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. अनैतिक मानवी विभागाच्या पोलिसांनी कारवाई करत वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका केली आहे.
स्पा सेंटरचा मालकांनी आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांकडून पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.