Pimpari Chinchwad News : पिंपरी : ‘पोलिस खात्यात नोकरी लावून देतो’ अशा आमिषाने तब्बल १० लाख रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार ३ डिसेंबर २०२२ रोजी तळेगाव दाभाडे येथे घडली. या प्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.१७) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संतोष बाबासो कदम (वय ५०), सनद संतोष कदम (२६), संकेत संतोष कदम (२६, सर्व रा. खारघर, नवी मुंबई) या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तब्बल १० लाख रुपये घेत फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०१९ पासून संशयितांनी फिर्यादीच्या पतीला पोलिस खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीच्या पतीचा विश्वास संपादन करून ३ डिसेंबर २०२२ ला फिर्यादीच्या घरी जाऊन पाच लाख रुपये घेतले. तसेच २८ फेब्रुवारी २०२३ ला पुन्हा पाच लाख रुपये फिर्यादीच्या मैत्रीणीसमोर घेतले. दहा लाख रुपये घेत संशयितांनी फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, या प्रकरणाची फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास केला जात आहे.