उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील सहजपूर (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील नांदूर या ठिकाणी असलेल्या परफेक इंजिन कम्पोनेस्ट या कंपनीला लागलेल्या आगीत हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.
ही घटना मंगळवारी (ता. ०७) दुपारी दोन ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी हजारो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहजपूर ग्रामपंचायत हद्दीतील नांदूर या परिसरात परफेक इंजिन कम्पोनेस्ट ही इंजिन ऑईल हि गाड्यांचे वाल तयार होतात.
मंगळवारी दुपारी ऑईल टॅंकच्या भट्टीत गरम वाल टाकीत असताना खाली पडले यामुळे सदरील वालच्या ऑइलने पेट घेतला. त्यामुळे भट्ट्यांचे व ऑइलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
दरम्यान, कंपनीत काम करणारे कामगार मनोज सिंग, विजय कांबळे, दिलीप जगताप, मणियार, कथले साहेब, प्रताप खेडेकर व कर्मचारी यांनी वाळू व पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.