(Parbhani ) परभणी : मौजमजा करण्यासाठी एका १९ वर्षीय तरुणाने चक्क २०० रूपयांच्या बनावट नोटा छापून नोटांचा चलनामध्ये वापर केल्याची धक्कादायक घटना (Parbhani) नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
विशाल संतोष खरात (वय- १९, रा. मानवत, परभणी) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी पेपर, कलर प्रिंटर व इतर साहित्य ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यामध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी दिलावर खान रशीद खान पठाण यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणीच्या मानवत शहरातील विशाल खरात हा बनावट २०० रुपयांच्या नोटा बनवून बाजारात विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मानवत शहरातील एका घराची पोलिसांनी झडती घेतली असता विशाल खरात हा कलर प्रिंटरच्या साहाय्याने बनावट नोटा छापत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येत असलेला पेपर, कलर प्रिंटर व इतर साहित्य ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने बनावट नोटाचा वापर चलनामध्ये वापरल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यामध्ये स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी दिलावर खान रशीद खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून विशाल खरात या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश स्वामी करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Mulshi Crime News : चॉकलेटचे आमिष दाखवून ७८ वर्षीय नराधमाने केला चिमुकलीवर बलात्कार, आरोपीला बेड्या