शिरूर : मलठण ( ता. शिरूर ) येथे पानटपरी वर पानाचे पैसे मागितले व ते दिले नाहित म्हणून लोखंडी पाईप व दगडाने मारहाण
करत जखमी केले.त्यानंतर ही पाठलाग करून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या बाबत गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढिल तपास करत आहे.
शिरूर तालुक्यातील मलठण येथील विकास सुभाष बोडरे ( वय २३ ) यांनी या बाबत फिर्याद दिली आहे.फिर्यादीने पान टपरीवर खाल्लेल्या पानाचे पैसे दिले नाहित. पैसे दे या कारणावरून शिवीगाळ करत आरोपी सद्दाम शेख, रशीद शेख, सुरज रोकडे सर्व (राहणार मलठण ) व रशीद शेख याच्या टपरी वरील अनोखी व्यक्ती ( राहणार शिरूर) यांनी विकास बोडरे यांला लोखंडी पाईप व दगडाने मारहान केली.
या बाबत सर्व हकीकत २० फेब्रुवारी रात्री २.३० वाजता मलठण येथील एस आर पानटपरी समोर घडली आहे. पानटपरीवरील अनोळखी व्यक्तीला पैसे दिले तरी पैसे दिले नाहीत. पैसे दे असे म्हणत शिवीगाळी दमदाटी सुरू केली. बोडरे याला खाली पाडून लोखंडी पाइपाने तळपायाला मारहान केली.
ही घटना घडल्यानंतर बोडरे हे त्यांच्या तावडीतून सुटून गेल्यानंतर पुन्हा दोन मोटर सायकल ने पाठलाग करून सरकारी दवाखान्याजवळ पकडून पुन्हा मारहाण केली. तुला जीवंत सोडत नाही. असे म्हणून पुन्हा मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलिस अधिकारी सुरेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक धनंजय थेऊरकर करत आहेत.