पाचगणी : पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील हनुमान गल्लीत भाड्याने राहत असलेल्या घराचा अनधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चौघांविरुद्ध पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, हनुमान गल्ली कृष्णाई बँकेसमोर वसंत कुंडलिक दाभेकर यांच्या मालकीचे रंजना लक्ष्मण गोरे राहत असलेले सी.स. नं 152/अ/1 या घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये रंजना मोरे यांच्या घरात घुसून घरातील साहित्य घराच्या बाहेर फेकून नुकसान केले. तसेच फिर्यादीच्या मुलास घराबाहेर काढून दरवाजाला कुलूप लावून फिर्यादीला आत जाण्यासाठी मज्जाव केला.
याप्रकरणी पाचगणी पोलिस ठाण्यात वसंत कुंडलिक दाभेकर (वय 72, रा. खिंगर), सुरेखा अरुण दाभेकर (वय 43), आशुतोष अरुण दाभेकर (वय 25 दोन्ही रा. पाचगणी), मंगल प्रकाश दाभेकर (वय 47) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रविंद्र कदम करत आहेत.