पाचगणी : पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील अग्निशमन केंद्राशेजारील पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबी मशीनच्या साहाय्याने अतिक्रमण काढून टाकले. पाचगणी नगरपरिषद मालकीचे फा.प्लॉ.नं. १ टी.पी.स्कीम. नं.२ अग्निशमन केंद्राशेजारील अतिक्रमण केलेली जागा पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि.१७) दुपारी दीडच्या सुमारास नगरपालिकेचे अतिक्रमण जेसीबी मशिन लावून अतिक्रमण मुक्त केली.
या कारवाईसाठी पालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख अमोल पवार, रचना सहाय्यक यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पालिकेचे कर्मचारी रविंद्र कांबळे, सुर्यकांत कासुर्डे, अफजल डांगे, बाबू झाडे यांनी सहभाग घेतला. यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले, भविष्यात पालिकेच्या जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात येईल. अतिक्रमणधारकांनी अतिक्रमित केलेली जागा मोकळी करून होणारे नुकसान टाळावे.