Pachagni News : (सातारा) अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणल्याप्रकरणी पांचगणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह तिच्या साथीदाराला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.(Pachagni News)
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
सुलेश कुमार असे ताब्यात देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी पाचगणी येथील खरात कॉटेज परिसरातून ताब्यात घेतले आहे.(Pachagni News)
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, दिल्ली येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचा प्रियकराने तीला फुस लावून घरातून पळवून घेवून गायब झाला होता. दिल्ली येथील कृष्णानगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. दिल्ली पोलिसांच्या तपासात हे दोघे पांचगणी येथे वास्तव्यास असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली यावरून दिल्ली पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी पाचगणीत दाखल झाले होते.(Pachagni News)
घटनेचे गांभीर्य ओळखून पाचगणी पोलीस ठण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अरविंद माने व त्यांचे सहकारी यांनी पाचगणीत अल्पवयीन मुलीची शोध मोहीम सुरू केली. सदरची मुलगी ही आपल्या प्रियकरासोबत पाचगणी येथील खरात कॉटेज येथे रहात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या अल्पवयीन मुलीसह तिचा साथीदार सुलेश कुमार याच्या तावडीतून सुटका करून पोलीस ठाणेत आणली.(Pachagni News)
दरम्यान, सदर मुलीस व सदर आरोपीस दिल्ली पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कामगिरीबद्दल पांचगणी पोलिसांचे अभिनंदन होत आहे.