वाशी : येथील एका हॉटेलमध्ये एका खासगी कंपनीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी इव्हेंट ऑर्गनायझरसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणे वाजवण्याच हॉटेलचालकाला विनंती केली. परंतु, मराठी गाणे वाजवण्यास या हॉटेल व्यवस्थापकाने नकार दिला.
यानंतर मनसे कार्यकर्ते तिथे पोहचले व त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाला जाब विचारत कानशिलात लगावली. यानंतर मारहाणही केली.
वाशी येथील हॉटेल ‘द टेस्ट ऑफ पंजाब’ मध्ये ही घटना घडली. हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली. यानंतर हॉटेल मालकानेही खुलासा करीत आपण मराठीच आहोत.
गैरसमजूतीतून गाणे वाजवले गेले नव्हते, पण नंतर गाणे वाजवल्याचे स्पष्ट करीत घडलेल्या प्रकारावर आपली दिलगिरीही व्यक्त केली.
मराठी आणि महाराष्ट्रात राहूनही मराठी गाणे वाजवले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मनसेने जाब विचारल्यानंतर मराठी गाणे वाजवण्यात आले. झिंगाट गाण्यावर सर्वजण थिरकले.
वाशी येथील हॉटेलवर मराठी गाणे वाजवण्यास बंदी असल्याचे समोर आले आहे. ज्यावेळी हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण झाली.
तत्पुर्वी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणे वाजवण्याची विनंती केल्यानंतर या हॉटेलमध्ये मराठी गाणे वाजवण्यास बंदी असल्याचेही त्यांना सांगण्यात आले होते.