आष्टी (बीड) : निवडणुकीत विरोधात काम केल्याचा मनात राग घरून नगरसेवकासह त्याच्या २० कार्यकर्त्यांनी तिघांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आष्टी येथे शुक्रवारी (ता.६) घडली आहे. या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर याप्रकरणी आष्टी पोलिसांनी आत्तापर्यंत ५ जणांना अटक केली आहे.
तात्या बबन सुरवसे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर नाना बबन सुरवसे आणि अमोल मुरकुटे हे दोघे गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी नगरसेवक संतोष सुरवसे यांच्यासह अक्षय ऊर्फ लक्ष्मण मुरकुटे, रणजीत ऊर्फ छोट्या गुंजाळ, सागर चांगुले, सौरभ संतोष जाधव, आदित्य गोविंद मुरकुटे, प्रकाश रामा मुरकुटे, रविल छगन विटकर, रवी धोतरे व इतर सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आष्टी येथील नगरसेवक संतोष सुरवसे याच्यासह दहा ते वीस जणांनी निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या रागातून दोन भाऊ तात्या सुरवसे नाना सुरवसे व अमोल मुरकुटे यांना घरी बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना ६ जानेवारीला घडली होती.
याप्रकरणी सुरवसे व मुरकुटे हे आष्टी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले होते. यावेळी नगरसेवक संतोष सुरवसेने केस करू नका, घरी बसून भांडण मिटवू असे म्हणत पोलीस ठाण्यातून तिघांना बाहेर आणले. त्यानंतर नगरसेवक संतोष सुरवसेने तिघांना त्यांच्या घरी नेले. तिघे घरात आल्यानंतर अक्षय मुरकुटेने गेट बंद केले.
त्यानंतर नगरसेवक सुरवस यांच्यासह १० ते २० कार्यकर्त्यांनी नाना सुरवसे आणि अमोल मुरकुटे यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जातात का, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतरांनी हत्यार, लाकडी दांड्याने मारहाण तिघांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणी गंभीर जखमी झालेले तात्या बबन सुरवसे यांचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. तर नाना बबन सुरवसे आणि अमोल मुरकुटे हे दोघे गंभीर जखमी आहेत.
दरम्यान, याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आधीच कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील मुख्य आरोपी नगरसेवक संतोष सुरवसे हा फरार आहे. पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.