शिरूर, (पुणे) : Shirur Crime – दुचाकीवरून ट्रिपलशीट प्रवास करणाऱ्या तरुणांना गाडी सावकाश चालवा असे म्हणल्याच्या रागातून तिघांनी एकाला बेदम मारहाण करून त्याची दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिरूर (Shirur Crime) शहरातील भाजीबाजार परिसरात घडली आहे. (Shirur Crime)
शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी लतीफ अस्लम तांबोळी (रा. हल्दी मोहल्ला, शिरूर, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिरूर पोलिसांनी भास्कर दत्तात्रेय घोडके, जितेंद्र ऊर्फ मोग्या भास्कर घोडके व जुबेर (पूर्ण नाव नाही) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लतीफ तांबोळी हे शिरूर शहरातील हलवाई चौकातून जात चालले होते. यावेळी त्यांनी घोडके बंधू व जुबेर यास गाडी सावकाश चालवा, असे म्हणाल्याने त्यांच्यात भांडणे झाली.
दरम्यान, याच भांडणाचा राग मनात धरून तिघांनी तांबोळी यांना मारहाण केली व भाजीबाजार परिसरात लावलेली त्यांची ॲक्टिव्हा पेटवून दिली. त्यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस करीत आहेत.