पुणे : राज्यासह अनेक भागात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, आत्महत्या यांसारख्या घटना तर घडत आहेत. असे असताना आता आंध्र प्रदेशातील नांद्याला जिल्ह्यातील कर्जबाजारी झालेल्या आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
यू महेश्वर रेड्डी (45 वर्षे) यांनी त्यांच्या पत्नीसह जीवन संपवले. मंगळवारी रात्री त्यांनी त्यांच्या फार्महाऊसमध्ये आत्महत्या केली.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने घेतलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज फेडता न आल्याने या जोडप्याने कोल्डड्रींकमध्ये विष मिसळलं आणि ते पिऊन आपलं जीवन संपवलं.” हे कुटुंबीय शेतकरी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या 22 वर्षाच्या मुलाने ऑनलाईन गेमिंगमुळे कोटींच्या घरात केलेले कर्ज या दाम्पत्याला फेडता न आल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
पुढे पोलिसांनी सांगितले की महेश्वर रेड्डी यांनी 2 कोटींचे कर्ज फेडण्यासाठी पाच एकर जमीन विकली होती. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी स्थानिक न्यायालयात झालेल्या तह आणि सामंजस्य कराराअंतर्गत आपल्या राहत्या घरासह इतर संपत्ती विकली होती. मात्र तरीही पूर्णपणे कर्ज न फिटल्यानंतर कर्जदार त्यांच्यामागे परतफेडीसाठी तगादा लावत होते. राहतं घरही गमावल्यानंतर हे दाम्पत्य त्यांच्या नातेवाईकांकडे राहात होतं. ज्याच्यामुळे या दाम्पत्यावर ही परिस्थिती ओढावली.
पुढे या मुलाने कोणते पाऊल उचचले आहे याबाबत कोणतीही माहिती नाही. दरम्यान आपल्या आई-वडिलांसाठी हा मुलगा गावात परत आला आहे की नाही याचीही माहिती मिळू शकलेली नसल्याचे पोलीसांनी सांगितले.