पुणे : चिकन न आणल्याच्या रागातून एकाच्या डोक्यात दगड घालून शेजाऱ्याने खून केल्याची धक्कादायक घटना वाघोली (ता. हवेली) परिसरात नुकतीच उघड झाली आहे.
शंकर नायक (वय ३५, सध्या रा. रानवारा हॅाटेलसमोर, वाडेबोल्हाई-केसनंद रस्ता, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी मेहबू यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेजारी विकास भोसले, कविता भोसले, बल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर नायक आणि आरोपी भोसले दाम्पत्य हे एकमेकांचे शेजारी आहेत. नायक यांना आरोपींनी चिकन आणण्यास सांगितले होते. चिकन न आणल्याने आरोपी नायक यांच्यावर चिडले. आणि आरोपींनी नायक यांची पत्नी मेहबू आणि मुलीला मारहाण करुन शिवीगाळ केली.
दरम्यान, या मारहाणीत शंकर नायक यांनी मध्यस्थी केली.तेव्हा आरोपी विकास भोसले आणि साथीदारांनी शंकर नायक मारहाण केली. आणि त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला. या घटनेत नायक गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी नायक यांच्या पत्नी मेहबू यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेजारी विकास भोसले, कविता भोसले, बल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील तिन्ही आरोपी फरार झाले आहे. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. तरी, पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार करीत आहेत.