दिनेश सोनवणे
पुणे – सोलापूर रेल्वे महामार्गावरील बोरीबेल (ता.दौंड) स्टेशन जवळ रस्ता ओलांडताना रेल्वेला धडकून एक जणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार (ता. ९) रोजी पहाटे घडली आहे.
महादेव विक्रम सरोदे (वय. ३० रा.बोरीबेल) असे मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, महादेव विक्रम सरोदे हा बुधवारी (ता. ९) पहाटे रेल्वे लोहमार्ग ओलांडत असताना आज्ञात रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे. या बाबतची खबर दौंड रेल्वे पोलिसांना बोरीबेल स्टेशन मास्तरांनी दिल्यानंतर दौंड लोहमार्ग पोलीस हवालदार अरुण टिंगरे यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टम करून गुन्ह्याची नोंद केली आहे.