लहू चव्हाण
पाचगणी : दक्षिण भारतात आणि विशेषतः केरळमध्ये ”ओणम सण” उत्साहात साजरा केला जातो. मागील तीन वर्षानंतर पहिल्यांदाच हा सण निर्बंधमुक्त साजरा होत असल्याने आबालवृद्धांमध्ये उत्साह वातावरण पाहायला मिळाले. पाचगणी शहरात केरळी व मल्याळी कुटूंबियांचे वास्तव आहे. येथील बेल एअर हॉस्पिटल व सेंट झेवियर हायस्कूलचे व्यवस्थापक फादर टॉमी यांच्या येथे आज ओणम सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी हॉस्पिटल व स्कूलमध्ये फुलांची रांगोळी काढण्यात आली होती.
दिवाळी सारखा हा सण असून वामन अवतारातील बळीराजा महाबलीच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो. पातळात गेलेला बळीराजा प्रजेला भेटण्यासाठी या दहा दिवस पृथ्वी वर येतो. त्याच्या स्वागतासाठी घराच्या पुढे फुलाच्या रांगोळ्या काढल्या जातात.ओनमच्या सणांमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. हनुमान तिरु ओनम या दिवशी मल्याळी नागरिक घराच्या समोर फुलांची रांगोळी काढतात. त्याला याला पुककलम म्हणतात.
यादिवशी इतर समाजाचे नागरीक शुभेच्छा देण्यासाठी केरळी बांधवांच्या घरी येतात. ओणम हा दिवस केरळी बांधवांसाठी मोठा उत्साहाचा आहे.ओणमच्या दिवसात वामनाच्या मूर्तीसह महाबलीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्याचे पूजन मोठ्या उत्साहात केले जाते.
दरम्यान, बळी राजाच्या समृद्ध आणि सामर्थ्यशाली राजवटीचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ‘ओणम’. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात जिथे-जिथे मल्याळी नागरिक आहेत तिथे, जाती धर्माच्या भिंती दूर सारत ओणम उत्साहात साजरा करतात. यावेळी हॉस्पिटल परिसरात सांगीतिक कार्यक्रमांचे आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते.