शिरुर : दुचाकीवरून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अज्ञात चोरट्याने चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटल्याची घटना शिक्रापूर बुरुंजवाडी रोडवर घडली आहे.
शकुंतला वामन वाबळे (वय- ६०) रा. वाबळेवाडी, शिक्रापूर (ता. शिरूर) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बाबळे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, शकुंतला वाबळे या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बुरुंजवाडी येथील शेतातून घरी येण्यासाठी रस्त्याचे कडेला उभ्या होत्या. यावेळी एक युवक दुचाकीहून आला आणि मी तुम्हाला ओळखतो चला मला पण शिक्रापूरला जायचे, असे म्हणून दुचाकीवर बसवले.
काही अंतर गेल्यानंतर दुचाकीहून खाली उतरवत चाकू दाखवून वाबळे यांच्या गळ्यातील दीड तोळा वाजण्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेऊन पोबारा केला. असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे करीत आहेत.