पुणे : मृत्यूचा सापळा बनलेला मुंबई – बंगळूर महामार्गावरील नवले पूलाजवळील भूमकर पुलावर येथे पुन्हा एकदा अपघात झाला असून या अपघातात पिकअप वाहनातील ४ प्रवासी जखमी झाले आहेत.
आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त झालेल्या पिकअप गाडीत आठ प्रवासी होते. यापैकी चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. माझ्या गाडीला पाठीमागून ट्रकने धडक दिल्याने नियंत्रण सुटले व वाहन पलटी झाले असल्याचे पिकअप चालकाचे म्हणणे आहे,
याबाबात माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस व महामार्ग सुरक्षा मेट्रोलिंगचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोचले. अपघातग्रस्त वाहन त्यांनी क्रेनच्या साहाय्याने बाजुला करताना जखमी रुग्नांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने या परिसरात अपघात होत आहेत. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झाले असून तातडीने ठोस उपाय योजना करण्याची मागणीने जोर धरला आहे.