पुणे : राज्यात १०० हून अधिक घरफोड्या करणाऱ्या ‘चोर राजाला गुन्हे शाखा युनिट क्र २ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल २४ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
‘चोर राजा’ उर्फ राजेश पपलु (रा. कात्रज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यात १०० हून अधिक गुन्हे ‘चोर राजा’ उर्फ राजेश पपलु दाखल आहेत. आरोपी पपलू पकडण्यासीठी पोलिसांनी रणनीती आखली. ‘चोर राजा’ नावाचा व्हाट्सअॅप ग्रुप तयार करून सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून ४२ तोळे सोने,४ किलो चांदीचे दागिने, दोन पिस्तुलसह काडतुसे असा एकूण २४ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी आरोपी पपलू ला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपीने पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या केल्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, आरोपी राजेश पपलूवर १०० गुन्हे दाखल आहेत. आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.